बातमीमहाराष्ट्र

मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत; म्हणून त्यानी उचलले हे पाऊल…

Newslive मराठी-  कर्जाला कंटाळून कंधार तालुक्यातील इमामवाडी गावातील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.  रामराव व्यंकटी जंगवाड वय (४२) असं त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

महेंद्रा फायनान्स, बचत गटाच्या कर्जाला कंटाळून व शेतीत सतत नापिकी होत असल्याने तसेच मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यामुळे शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

इमामवाडी येथील रामराव जंगवाड हे आपले भाऊ बाबूराव व्यंकटी जंगवाड यांच्या नावे असलेली शेती करत होते. गेल्या दोन चार वर्षापासुन शेतीत होणारे सततचे नुकसान त्यातच त्यांनी महेंद्रा फायनान्सचे ८० हजार रूपयांचे खासगी कर्ज घेतले होते. बचत गटाचेही त्यांच्यावर कर्ज होते.

दरम्यान, या सर्व कर्जाच्या परत फेडीतून जगणे सुसह्य होत नव्हते. त्यातच मुलगी लग्नाला आली असल्याने लग्नासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यांपासून नातेवाईकांसमोर बोलतांना मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे निराशाजनक उदगार ते सतत काढत होते.