महाराष्ट्रराजकारण

कंगणा राणावतला झेड प्लस सुरक्षा द्या- भाजपची मागणी

कंगणा राणावत मुंबईत आली त्यावेळी तिला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली. आता कंगणाला झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करा. तसंच कंगणाला तिच्या ऑफीसच्या तोडफोडीनंतर नंदकिशोर गुर्जर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

हिमाचल प्रदेश सरकारच्या शिफारसीनंतर केंद्राकडून कंगणाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. आमदार गुर्जर म्हणाले कंगणाच्या जीवाला धोका आहे. कुख्यात गुंड डॉन दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून मुंबई महानगरपालिकेने कंगणाचं ऑफिस तोडलं.

त्यामुळे तिला अधिक सुरक्षा द्यावी. महाराष्ट्र राज्य सरकारमधील काही नेत्यांचे अंडरवर्ल्ड बरोबर संबंध आहेत. त्यामुळे याची एनआयएमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे हे ‘डमी’ मुख्यमंत्री आहेत, असंही गुर्जर यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. यामुळे आता हा वाद अजूनच पेटल्याची शक्यता आहे.