कोरोनामहाराष्ट्र

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह!

कोरोनाचा देशात उद्रेक होत आहे. राजकीय नेत्यांना देखील कोरोना होत आहे. आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. ते गृहविलगीकरणात राहणार आहेत.

आपल्याला काही लक्षणे नसून आपण गृहविलगीकरणात राहणार आहे. घरातूनच कामकाज हाताळणार आहे. जे कोणी आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विटद्वारे केले आहे. देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुराप्पा या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील कोरोनाची लागण झाली होती. नुकतेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत.

याचबरोबर गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतरही एम्स रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्यांना नुकताच डिस्चार्ज मिळाला आहे.