आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी; तब्बल 5 कोटी रोजगार होणार उपलब्ध

देशात कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक उद्योग बंद पडले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक जणांवर बेरोजगाराचा डोंगर कोसळला आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक चांगली बातमी दिली आहे. गडकरींनी सांगितले की येत्या पाच वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात 5 कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.

गडकरी यांनी सांगितले की, त्यांचं लक्ष्य सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) चे योगदान 30 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांपर्यंत केले जावे. निर्यात 49 टक्क्यांनी वाढवून 60 टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व एमएसएमई क्षेत्रातून तब्बल 11 कोटी लोकांना रोजगार मिळू शकतो, असेही गडकरी म्हणाले.

इनोवेशन आणि आंत्रप्रेन्योरशिप यांना दिली जाणारी मदत अधिक व्यापक करण्याची गरज आहे. त्यामुळे नवीन प्रतिभाशाली लोकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. मंत्रालयाकडून जारी केलेल्या वक्तव्यानुसार गडकरींनी सांगितले की, इनोवेशनमध्ये अधिक शोध करीत नवनवीय पर्याय शोधण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हे क्षेत्र देशातील विकासाचं इंजिन आहे, आणि त्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. यामुळे आता रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.