महाराष्ट्रराजकारण

गोपीनाथ मुंडे याचा अपघात की घात? चौकशी झाली पाहिजे…..

Newslive मराठी- गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला, त्या दिवसापासून अपघात की घात, असा संशय होता, आजही तो कायम आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

सय्यद शुजा याने केलेला खुलासा ऐकून या संशयाला पुष्टी मिळते. मृत्यू प्रकरणाची ‘रॉ’ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

2014 मधील लोकसभा निवडणूक ईव्हीएम’मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली,” असा खबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केला आहे. या दाव्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना संशय व्यक्त केला आहे.