आंतरराष्ट्रीयबातमी

 गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी- जयंत पाटील

Newslive मराठी- गोपीनाथ मुंडे  यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून नव्हे, तर आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

२०१४ मधील निवडणुकांत ज्यांनी या मशिनचा फायदा घेतला, तेच मुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत.  मुंडे यांच्या अपघातानंतर गाडी चालविणाऱ्या चालकावर कारवाई का झाली नाही, जी दुसरी गाडी होती, त्या गाडीचालकावर काय कारवाई झाली, याबाबत कुठेही स्पष्टता नाही.

दरम्यान, काल एका अभियंत्याने गौप्यस्फोट करून मुंडे यांची व इतर १२ जणांची हत्या झाल्याचे जाहीर केले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. निवडणूक आयोग कितीही स्पष्टीकरण करीत असले, तरी आता लोकांचा विश्वास बसणार नाही.

गोपीनाथ मुंडे याचा अपघात की घात? चौकशी झाली पाहिजे…..