आंतरराष्ट्रीयव्यापार

सरकारकडून रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी

Newslive मराठी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करताना आता व्होकल फॉर लोकल होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी सरकारनं देशात रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

परदेश व्यापार महासंचालनालयानं (डीजीएफटी) यासंदर्भात एक पत्रक काढलं त्यात, रंगीत टीव्हीसाठी असलेल्या आयात धोरणात बदल केले गेले असल्याची माहिती यात देण्यात आली आहे. तसंच मुक्त या श्रेणीतून हटवून प्रतिबंधित या श्रेणीत टाकण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

नुकतंच सरकारने देशांतर्गत वस्तूंचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तसंच कमी आवश्यकता असलेल्या वस्तूंच्या आयातीत कपात करण्यासाठीही काही निर्णय घेतले आहेत. चीन आणि व्हिएतनाम व्यतिरिक्त भारत हाँगकाँग, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, जर्मनी आणि थायलंडसारख्या देशांकडूनही रंगीत टीव्ही आयात करतो. वाणिज्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार भारतात रंगीत टीव्हीची सर्वाधिक आयात चीन आणि व्हिएतनाममधून होतं.

2019 या आर्थिक वर्षात देशात तब्बल 7 हजार 120 कोटी रूपयांच्या रंगीत टीव्हीची आयात करण्यात आली होती. तर आर्थिक वर्ष 2020 मध्ये यात घट होऊन ती 5 हजार 514 कोटी रूपये इतकी झाली, 2019 या आर्थिक वर्षात रंगीत टीव्हीच्या आयातीत 52.86 टक्क्यांची वाढ झाली होती. परंतु आता सरकारनं रंगीत टीव्हीच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.3

महत्वाच्या बातम्या-

-राफेलला घाबरला पाकिस्तान! गुगलवर शोधत आहेत माहिती

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi