महाराष्ट्रराजकारण

“महाविकास आघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा”

महाविकास आघाडी सरकार पडेल असे विरोधक सतत सांगत असतात. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी वाढदिवसाच्या संध्येला स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. यामुळे नाथाभाऊ पक्षात नाराज आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

राज्य सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटतं नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यातील सरकार पडेल, ही आशा करणं सोडावी, असा सल्ला खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांना दिला आहे.

विधानसभा निवडणुकीपासून खडसे हे पक्षातल्या नेत्यांवरच टीका करत आहेत. नाव न घेता ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सतत टीका करत आहेत.