बातमीमहाराष्ट्र

गुंगीचे औषध देऊन महिलेचा विनयभंग

Newslive मराठी-  पिंपरीत ओळखीच्या महिलेस हाॅटेलमध्ये बोलावून तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकले व तिचा  विनयभंग केला. या आरोपीविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधेश्याम चंद्रकांत गव्हाणे असं गुन्हा दाखल केलेल्या आरोपीच नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी महिलेस हाॅटेलात बोलावून घेतले.  शितपेयातुन गुंगीचे औषध दिले. मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.

अशी फिर्याद पीडीत महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.