आंतरराष्ट्रीयबातमी

हार्दिक पटेल बोहल्यावर चढणार

Newslive मराठी- गुजरातमधील पाटीदार पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल येत्या २७ जानेवारीला बोहल्यावर चढणार आहे. हार्दिक हा त्याची बालमैत्रीण किंजल पारीख हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे.

हार्दिकच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाह सोहळ्याचं निमंत्रण केवळ १०० जणांना असेल. त्यात वधुवराचे कुटुंबीय व जवळच्या मित्रमंडळींचा समावेश असेल.

किंजल ही हार्दिकची बहीण मोनिका हिच्यासोबत शाळेत होती. ती वरचेवर हार्दिकच्या घरी यायची. तिथंच तिची हार्दिकशी ओळख झाली. कालांतरानं या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. पटेल आणि पारीख कुटुंबीयांमध्येही उत्तम संबंध आहेत. किंजल ही वाणिज्य शाखेची पदवीधारक असून सध्या ती वकिलीचं शिक्षण घेत आहे.

दरम्यान, लग्नाच्या या वृत्ताविषयी अद्यापही हार्दिककडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.