आंतरराष्ट्रीयमनोरंजन

हार्दिक पांड्या असा नव्हता- एली अवराम

Newslive मराठी- कॉफी विथ करण’ शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या हार्दिक पांड्या आणि केएल राहुल वादात अडकले होते. हार्दिकची तथाकथित गर्लफ्रेंड ईशा गुप्तानेही आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.

आता हार्दिकची एक्स गर्लफ्रेंड एली अवरामनेही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एलीने आपल्‍या प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या आहेत. एलीने हार्दिक विषयी म्‍हटले आहे की, ‘ज्‍या व्‍यक्‍तीला मी ओळखत होते, तो असा नव्‍हता. मी भारतात नव्‍हते. परंतु, अनेकांचे मला फोन आले.

दरम्यान, अनेक पत्रकारांनी मला प्रतिक्रिया विचारल्‍या. परंतु, मला माहित नव्‍हते. यानंतर मी शोचे काही फुटेज पाहिले. हे फुटेज पाहिल्‍यानंतर ती गोष्‍ट खूपच दु:खद वाटली. मला वाटते की, हे माझ्‍यासाठी खूपच आश्‍चर्यजनक होते. कारण, ज्‍या हार्दिक पांड्‍याला मी ओळखत होते, तो असा नव्‍हता. असेही ती म्हणाली.

 

‘लोक अशा घटनेवर रिॲक्‍ट करतात, ही खूप चांगली बाब आहे. आपल्‍या समाजात असा व्‍यवहार चालत नाही. आपण २०१९ मध्‍ये जगतोय. महिलांकडे ती ताकद आहे, आवाज आहे. त्‍या आपला मुद्‍दा स्‍पष्‍टपणे मांडू शकतात.’