महाराष्ट्र राजकारण

सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?- आशिष शेलार

कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे.

यावरून भाजपाने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुध्दी गहाण ठेवली काय?, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. “मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?” असं शेलार यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं एक ट्विट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *