इंदापूरमहाराष्ट्र

इंदापूर तालुक्यात ‘कोरोना’चा कहर! रुग्णांचा आकडा 1000 पार

आता ग्रामीण भागात देखील कोरोना वाढतच आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटर अंतर्गत दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी इंदापूर तालुक्यातील एकुण 129 जणांची कोरोना रॅपिड आटिंजन टेस्ट घेण्यात आली.त्यामध्ये एकुण 29 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.तर 100 निगेटीव्ह आले असुन बारामती येथील खासगी प्रयोग शाळेत इंदापुर तालुक्यातील 39 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली, त्यापैकी 16 पाॅझीटीव्ह आले असुन 23 निगेटीव्ह आले आहेत.

इंदापूर तालुक्याने 1000 टप्पा पूर्ण केला असुन तालुक्यात दिनांक 4 सप्टेंबर सायंकाळी 9 वाजेपर्यंत एकुण 1026 पाॅझीटीव्ह आले असुन त्यापैकी 40 जणांचा मृत्यु झाला असल्याची माहीती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.

पुणे जिल्हाधीकारी यांचा दिनांक 3 सप्टेंबर रोजीच्या इंदापूर तालुक्यातील दौर्‍यामुळे इंदापूर शहर व तालुक्यात लाॅकडाउन बंदबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. प्रशासनाच्या वतीने पुढील काळात इंदापूर तालुका किंवा इंदापूर शहर हे लाॅकडाउन करण्यात येणार नसल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. यामुळे येणाऱ्या काळात अजून काळजी घेणे आवश्यक आहे. बारामती सोमवार पासून 14 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे.