बातमीमहाराष्ट्रराजकारण

“त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं”,चंद्रकांत पाटलांना टोला

Newslive मराठी- विरोधी भाजपाकडून सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळ्या गोष्टीवरून टीका केली जात आहे. त्यामुळे सरकार विरूद्ध भाजपा यांच्यात शीतयुद्ध बघायला मिळत असून, अचानक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचं विधान केलं होतं. या विधानावरून शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे

रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख करता टीका केली आहे. “आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले.

सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-मुख्यमंत्री राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी हरकत नाही- शरद पवार

-व्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री