महाराष्ट्र

पुण्यात 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

Newslive मराठी- परतीच्या पावसाने राज्याला झोडपले आहे. अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच पुणे आणि इतर परिसरात दोन दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कयार चक्रीवादळाचा प्रभाव अद्याप कायम असून राज्यात 1 नोव्हेंबर सर्वदूर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लक्षद्वीप आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर ‘महा’ हे चक्रीवादळ तयार झाले आहे.

दरम्यान, दोन नोव्हेंबरनंतर पाऊस पुर्ण थांबेल, असं पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते- संजय राऊत

सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका– संजय राऊत

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi