लक्षवेधीलाइफस्टाईल

हिरोची हि जबरदस्त बाईक बाजारात दाखल…

Newslive मराठी- हिरो मोटोकाॅर्प कंपनीने हीरो एचएफ डीलक्स आयबीएस ही जबरदस्त बाईक बाजारात उतरविली आहे. दिल्लीमध्ये एक्स शोरुम या बाईकची किंमत ४९,३०० रुपये आहे. १ एप्रिल २०१९ पासून सरकारच्या नव्या नियमानुसार आणि सुरक्षतता नुसार कंपनीने ही बाईक लॉन्च केली आहे.

बाईकमध्ये किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट दोन्हीचे पर्याय देण्यात आलेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, या बाईकमध्ये ८८.२४ किमी प्रति लीटर मायलेज देण्याची क्षमता आहे. ब्रेकिंग सिस्टम आधीपेक्षा अधिक चांगली करण्यात आली आहे. त्यामुळे कमी वेळेत ही गाडी थांबेल.

नवीन नियमानुसार १२५ सीसी पेक्षा कमी इंजिन वाली बाईक्समध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. शिवाय बाइक (एचएफ डिलक्स) मध्ये १३० एमएम मोठ्या रिअर ड्रम दिले आहेत. बाइकचे इंजिन ८००० आरपीएम वर ८.२४ बीएचपीची पॉवर आणि ८००० आरपीएम ८.०५ एनएमची टॉर्क जेनरेट करते.

@Newsliveमराठी