बारामतीमहाराष्ट्रराजकारण

बारामतीत झळकळ्या पुणेरी पाट्या

Newslive मराठी- विधानसभा निवडणुकांमध्ये बारामतीत अजित पवार 1 लाख 65 हजार 265 मतांनी विजयी झाले होते. पवारांनी भाजपचे उमेदवार गोपिचंद पडळकर यांच्यासह बाकी सर्व उमेदवारांचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

दरम्यान, त्याला अनुसरुन बारामतीत अजित पवारांच्या अभिनंदनाची हटके पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर या पोस्टरवर आहे. बारामतीतील पोस्टरवर पुणेरी पाटीसारखा खोचक आणि हस्यास्पद असा मजकूर सर्वांना आकर्षित करत आहे.

बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ आमच्या येथे डिपाॅझिट जप्त करून मिळेल असा मजकूर असलेला अजित पवार यांचं अभिनंदन करणारा फलक लावण्यात आला आहे. हा फलक सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.

सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका – संजय राऊत

माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचा जास्त आनंद- जितेंद्र आव्हाड

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi