आंतरराष्ट्रीयबातमी

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड; ग्रंथही जाळले…

Newslive मराठी-  पाकिस्तान काही समाजकंटकांनी हिंदू मंदिराची तोडफोड केली आहे. तसेच पवित्र ग्रंथ जाळण्यात आले आहेत. सिंध प्रांतातील खैरपूर जिल्ह्यात मागील आठवड्यात ही घटना घडली आहे.

या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच इम्रान खान यांनी ट्वीट करून दोषीना अटक करून त्याच्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या सर्व बाबी कुरानाच्या विरोधात असून हिंदू समुदायातील नागरिकांनी याप्रकरणी खटला दाखल केला आहे. हिंदू मंदिराच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यदल स्थापन करण्याची मागणी पाकिस्तान हिंदू परिषदेचे सल्लागार राजेश कुमार हरदसानी यांनी केली.