खेळमहाराष्ट्र

हिटमॅन रोहीत शर्माला ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर!

भारताचा स्टार फलंदाज हिटमॅन रोहित शर्माला ‘खेलरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रोहितच्या आगोदर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांना हा पुरस्कार भेटला होता. आता रोहित शर्माचे नाव यामध्ये आले आहे.

रोहित शर्माची कामगिरी बघता रोहित शर्माच्या नावावर 29 एकदिवसीय शतक आणि 4 T-20 शतकांची नोंद आहे. रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेट मध्ये 3 द्विशतक झळकावले आहेत.तसेच गेल्या वर्षी इंग्लंड मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहितने तब्बल 5 शतके झलकावली होती.त्यामुळेच खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्मा च्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

रोहित शर्मा एकाच विश्वचषक स्पर्धेत 5 शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च 264 धावा रोहितच्याच नावावर आहेत. एकाच वर्षी सर्वाधिक षटकार मारणार खेळाडू हा रोहित शर्मा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने निढास ट्रॉफी आणि आशिया चषक जिंकला होता.अशा प्रकारे अनेक रेकॉर्ड रोहितच्या नावावर आहेत.