आंतरराष्ट्रीयखेळ

हिटमॅन रोहित शर्माची चौथ्या कसोटीतून माघार

Newslive मराठी-  काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रोहितने मी बाप होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या आनंदी बातमीमुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच रोहितच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

दरम्यान, सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, आपल्या लाडक्या लेकीला पाहण्यासाठी तो लवकरच भारतात परतणार आहे.  चौथ्या कसोटी सामन्यासाठी रोहित मुकणार असला तरी तो एकदिवसीय मालिकेसाठी पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतणार आहे. भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे.