कोरोनाराजकारण

गृहमंत्री अमित शाह करोनामुक्त, ट्विट करत दिली माहिती

Newsliveमराठी – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करोनामुक्त झाले आहेत. स्वतः शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमद्ये उपचार सुरु होते.

मात्र डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचं शाह यांनी सांगितलं होत. अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाली होती.

अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शाह मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:चं विलगीकरण तसंच चाचणी करण्याची विनंती केली होती.

यावेळी अमित शाह यांनी आपण हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या प्रकृतीची काळजी घेतलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. याचसोबत मेदांता हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही शाह यांनी आभार मानले आहेत.