महाराष्ट्रराजकारण

पोलीस भरतीत 13 टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढणार- गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यात मराठा समाज्याच्या आरक्षणावरून राजकारण तापले आहे. यातच आता राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, ही भरती करताना मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार असल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पण ही बाब कायद्यानुसार तपासून मराठा समाजाला योग्य तो न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. सरकार पुढील दोन दिवसात मराठा आरक्षणाचा मसुदा घटनापीठासमोर सादर करणार आहे. राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती लवकरच केली जाणार आहे.

प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, असं असलं तरी या भरतीचा लाभ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होणार नसल्यामुळे राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मराठा समाज मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. उदयनराजेंनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.