महाराष्ट्रराजकारण

मास्क न वापरणाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांनी दिले कठोर आदेश

नागपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना काळात मास्क न वापणाऱ्यांबाबत गृहमंत्र्यांनी कठोर निर्णय घेतला आहे. नागपूरात मास्क न घालणाऱ्यांकडून 200 ऐवजी 500 रुपये दंड वसूल करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, नागपूर शहरातील अनेक दुकानदार ग्राहक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत नाहीत. मात्र, लॉकडाऊनला बरेच अधिकारी विरोध करत आहे. लॉकडॉऊनमुळे गरिब जनतेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याळे पुन्हा लॉकडाऊन नको, असं मत अधिकाऱ्यांनी मांडलं आहे. नागरिक मास्कचा वापर करीत नाही. नागरिक ऐकत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा नाही, असं गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत, व पोलीस आयुक्त यांच्या उपस्थित रविवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.