आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानाच्या पार्थिवाला दिला खांदा

Newslive मराठी-  पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बडगाममध्ये श्रद्धांजली वाहिली. तसेच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही  दिला. सर्व शहिद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात येत आहेत.

दरम्यान, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली मंत्रीमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पाकिस्तानचे नाव न घेता शेजारील देशाला याची मोठी किंमत   मोजावी लागेल. या हल्ल्याच्या मागे जे कोणी आहेत त्यांना शिक्षा मिळणारच असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. २००४  नंतर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा एवढा मोठा हल्ला घडवला आहे. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

निवडणूक सोडा; पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा- उद्धव ठाकरे

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करेल – पुतिन

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…