आंतरराष्ट्रीयलक्षवेधी

समुद्रात चक्रीवादळाचा हवामान खात्याचा इशारा

Newslive मराठी-  अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

किनारपट्टीपासून 300 किलोमीटर दूरवर चक्री वादळ असणार आहे. मात्र वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने समुद्र खवळलेला असू शकतो. त्यामुळे 11 आणि 12 जून रोजी मच्छिमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, मच्छिमारांबरोबरच किनारपट्टीलगतच्या रहिवाशांना देखील सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi