महाराष्ट्रराजकारण

मी शिवसैनिक आहे, पोकळ धमक्या देत नाही; संजय राऊत यांचा कंगणाला इशारा

मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेले वक्तव्य कंगनाला चांगलेच महागात पडत आहे. अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई विषयी केलेल्या वक्तव्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. संजय राऊत यांनीही कंगणाच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करतं आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे, असं म्हणत राऊतांनी कंगणावर टीका केली आहे.

मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे. दरम्यान हा वाद आता वाढतच आहे. मुंबईत येणार आहे कोणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा असे कंगला म्हणाली आहे