महाराष्ट्रराजकारण

मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे- जितेंद्र आव्हाड

Newslive मराठी-  बीडमध्ये बुधवारी संविधान बचाव महासभा झाली. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी  देशाची सध्याची स्थिती ही हुकूमशाहीसदृश असल्याची टीका करताना इंदिरा गांधी यांना लक्ष्य केलं. इंदिरा गांधी यांनीही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, अशा शब्दांत आव्हाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

“बीडमध्ये केलेला भाषणाचे अर्थ अनर्थ काढले जात आहे. इंदिरा गांधींना अतिशय आदराने मानणारा मी एक राजकीय कार्यकर्ता आहे, ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष नाही तर एक लोकचळवळ आहे. इंदिरा गांधींनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकतात. देशात जेव्हा जेव्हा लोकशाहीच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे असं लोकांना वाटतं तेव्हा जनता पेटून उठते.

आज अमित शाह आणि मोदींविरोधात तेच घडत आहे. इंदिरा गांधींइतकं कतृत्त्व कोणाचंच नाही. जर त्यांचा पराभव होऊ शकतो तर मोदी आणि अमित शाह कोण आहेत. इंदिरा गांधींचा समर्थक आहे हे सांगायला मला लाज वाटत नाही. इंदिरा गांधींची तुलना मोदी-शाह यांच्याशी होऊच शकत नाही,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

बुरखा घालून हल्ले करणं मर्दानगी नाही- उद्धव ठाकरे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi