इंदापूरमहाराष्ट्रराजकारण

इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे- हर्षवर्धन पाटील

Newslive मराठी-  इंदापूर विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील म्हणाले मी इंदापूर तालुक्याला स्वच्छ आणि सुजलाम-सुफलाम बनवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. ते इंंदापूरतील प्रचारार्थ सभेत बोलत होते.

मी सर्व धर्मीयांना समान म्हणून इंदापूर शहरात आणि तालुक्यासाठी मनापासून काम करत आहे. नगरपरिषद मध्ये विरोधी पक्षाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज केले होते. नगरपरिषदेवरील ते कर्ज आम्ही फेडले. तसेच इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छतेच्या अभियानात देशात 10 वा नंबर पटकावला होता. असे पाटील यावेळी म्हणाले.

आता देशात महायुतीचे सरकार आहे. आणि राज्यात सुद्धा महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे सत्तेचा फायदा इंदापूर शहराला आणि तालुक्याला मिळावा तसेच शहर आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा असे आवाहन पाटील यांनी उपस्थित नागरिकांना केले.

विरोधी पक्षाकडे कुठलेही मुद्दे नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधक मुद्दामपणे जातीचे राजकारण करीत आहेत. असंही ते यावेळी म्हणाले.

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध !

मित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल

मोदी चुकीचे बोलले, बुद्ध काही उपयोगाचा नाही – संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi