बातमीमहाराष्ट्रराजकारण

मी मुंबईला येतेय, कोणाच्या बापात हिंंम्मत असेल तर मला रोखून दाखवा- कंगणा

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राजकीय नेत्यांपासून ते अनेक कलाकारांनी तिच्यावर जोरदार टीका केली. कंगणावर राजकीय नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात टीका केली. आता तिने सर्व टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मी मुंबईला येत असून कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात कंगणाने टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात तिनं ट्विट केलं आहे. मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत त्यामुळे मी ठरवलं आहे की येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर मी मुंबईला यायचं. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार याची वेळ लवकरच सांगेल, असं कंगणाने म्हटलं आहे.

मराठी कलाकार, राजकीय नेते आणि सोशल माध्यामांनी कंगणावर मोठ्या प्रमाणात टीका केली असून कंगणाने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील तिच्यावर जोरदार टीका केली आहे.