महाराष्ट्रलक्षवेधी

बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते- कंगणा रनौत

वाईट प्रवृत्तींविरोधात बोलत असल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मला संरक्षणाची गरज आहे. हे संरक्षण हिमाचल प्रदेश पोलिसांनी द्यावे अथवा केंद्रीय पोलिसांनी द्यावे, असे अभिनेत्री कंगना रनौत ट्विटरवर म्हणाली आहे. भाजप नेते राम कदम यांनी मुंबई पोलिसांनी कंगनाला संरक्षण द्यावे अशी मागणी करणारे ट्वीट देखील केले होते.

ट्वीटला रिप्लाय करत कंगनाने पोलीस संरक्षण हवे असले तरी मुंबई पोलिसांची भीती वाटते असे सांगितले आहे. याबाबत बोलताना ‘माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी,’ असे कंगनाने म्हंटले आहे.

कदम म्हणाले, ‘अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांविषयी माहिती देण्यास तयार आहे. मात्र, यासाठी तिला सुरक्षा देणं जरुरीचं आहे. दुर्देव म्हणजे महाराष्ट्र सरकारने अजूनही तिला सुरक्षा दिलेली नाही”, असे ते म्हणाले.