Newslive मराठी- राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात मला फारसे स्वारस्य नसून, मी पक्षाकडे लोकसभेसाठी तिकिट मागितले आहे. महिला मुख्यमंत्री झाल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत. पहिली महिला मुख्यमंत्री अशा प्रतिकात्मक पदांवर माझा अजिबात विश्वास नाही. असे स्पष्ट मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. दौंड शहरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
लोकसभेच्या सभापतींनी माझ्या संसदीय कामाचे कौतुक केले असून दिल्ली मध्ये मी सर्वात क्रियाशील खासदार म्हणून काम करीत आहे. निर्णयप्रक्रियेच्या मोठ्या पदांवरील व्यक्तींची निवड करताना लिंगभेदात अडकू नये. नोटबंदी, जीएसटीची चुकीच्या पध्दतीने झालेली अंमलबजावणी आणि शेतकर्यांच्या हिताचे निर्णय न झाल्याने नाराजी आहे. सर्वसामान्य शेतकरी भरडला जात असताना शिवसेनेने सत्तेत राहून टीका करणे योग्य नाही. असंही सुळे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये आरक्षणास पाप की योजना असे संबोधले होते व तेच आता विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण देत आहेत.