महाराष्ट्र

हेलिकॅप्टरमध्ये फिरण्यासाठी मी राजकारणात आले नाही – पंकजा मुंडे

Newslive मराठी- चार वर्षे झाली तरीही गोपीनाथ मुंडे या नावातील पाॅवर कायम आहे. दोन दिवसांपासून त्यांच्याबद्दल पुन्हा कल्लाळ केला जातोय. माझ्या वैयक्तीक जीवनात विरोधक रोज उलाढाल करतात. पण मी घाबरत नाही. माझा राजकारणात येण्याचा हेतू मंत्रीपद घेण्याचा अथवा हेलिकॅप्टरमध्ये फिरण्याचा नाही तर वंचीतांचा वाली बनण्यासाठी मी राजकारणात आले.

मला रडण्याचे माहिती नाही. मला लढण्याचे माहिती आहे. मुंडेसाहेब अचानक गेल्यानंतर माझ्यासह घरच्या लोकांचे आयुष्य कोलमडून पडले होते. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर अजून शक्तीनिशी लढणार” या शब्दांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपला इरादा स्पष्ट केला.

दरम्यान, मुंडे सांहेबांवरती प्रेम करणाऱ्या लोकांसाठी मी राजकारणात आले. साहेबांनी मला दुरदृष्टी ठेवून राजकारण शिकविले, असे मुंडे म्हणाल्या.

ईव्हीएम घोटाळ्याच्या कल्पनेमुळे गोपिनाथ मुंडेंची हत्या’

गोपीनाथ मुंडे याचा अपघात की घात? चौकशी झाली पाहिजे…..

गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हावी- जयंत पाटील