आंतरराष्ट्रीयबातमी

मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज नाही….

Newslive मराठी-  जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरातून संतापाची लाट पसरली आहे.

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झालाही पुलवामा हल्ल्यानंतर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या घटनेनंतर सानियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक संदेश लिहीत ट्रोलर्सना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

मला माझी देशभक्ती सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज नाही. तुमच्या मनातला राग बाहेर काढण्यासाठी आम्हाला प्रत्येकवेळा टीकेचं लक्ष्य का केलं जातं? मला पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोशल मीडियाची गरज लागत नाही, सर्व जनतेप्रमाणे आम्हीही दहशतवादाविरोधात आहोत, संदेश देत सानिया मिर्झाने आपलं म्हणणं सोशल मीडियावर मांडलं आहे.

बारामतीत सीरआरपीएफच्या जवानाला पोलिसांकडून बेदम मारहाण

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…

भारताने लढाई सुरू ठेवावी रशिया सहकार्य करू- पुतिन

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi