महाराष्ट्र

धनगर आरक्षणासाठी मी स्वतः बैठका घेतल्या होत्या – शरद पवार

Newslive मराठी:  धनगर आरक्षणासाठी मी स्वतः बैठका घेतल्या होत्या. मात्र निवडणुका लागल्याने त्या वेळी तोडगा निघू शकल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगलीत बोलताना बारामतीत धनगर समाजाच्या आरक्षणावेळी बारामतीतील नेते भेटायला गेलेच नाहीत, अशी टीका केली होती, त्यावर पवार म्हणाले, देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही धनगर आरक्षणाबाबत सरकारने फसवणूक केली. वास्तविक पाहता धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः बैठका घेतल्या.

आरक्षणाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी निवडणुका आल्या. बारामतीत आंदोलन सुरू असताना धनगर समाजाला शब्द देणारे देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, गेली साडेचार वर्षे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांचे सरकार असताना सरकार धनगर समाजाची फसवणूक करीत आहे. खरे तर धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वांनी एकत्र बसून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमीच सहकार्याची भूमिका घेईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *