महाराष्ट्र

नदीजोड प्रकल्पाच्या फाईली मी बाहेर काढल्या- गिरीश महाजन

Newslive मराठी- नदीजोड प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प झाल्यावर नाशिकला चोवीस तास पाणी मिळेल. मराठवाड्याचीही तहान शमेल अशी माहिती जलपंसदा गिरीश महाजन यांनी दिली.

समुद्रात वाहून जाणारे पाणी अडविले तरच राज्याला मदत होईल. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील महत्वाकांक्षी प्रकल्प रेंगाळले. मात्र आपण सत्तेत आल्यानंतर पुन्हा नदीजोड प्रकल्पाच्या फायली काढल्या.

दरम्यान, दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रातील धरणामध्ये वळविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या  महत्वाच्या या प्रकल्पासंदर्भात नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.  लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल त्यानंतर शेतीत क्रांती होईल. नागरिकांना २४ तास पाणी मिळेल, सगळ्यांना दिलासा मिळेल असा दावा महाजन यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *