महाराष्ट्रराजकारण

शिवसेनेकडून मतदानासाठी फोन आला म्हणून मी मतदान केलं

Newslive मराठी- अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानासाठी शिवसेना नेत्यांनीच आपल्याला फोन केला होता, त्यामुळेच आपण महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचा दावा श्रीपाद छिंदमने पत्रकारांशी बोलताना केलाय.

महापौर निवडणुकीदरम्यान छिंदम याने शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान केले. त्यामुळे सभागृहात छिंदम याला मारहाण झाली. छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे.  त्याने सेनेचा उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली.

अहमदनगर महापालिकेत महापौरपदाच्या मतदानासाठी शिवसेना नेत्यांनीच आपल्याला फोन केला होता, त्यामुळेच आपण महापौर निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याचा दावा श्रीपाद छिंदमनं केलाय. शिवसैनिकांकडून झालेल्या मारहाणीबद्दल बोलताना त्यांनी ‘हा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट’ असल्याचंही म्हटलंय. आपल्या म्हणण्याचा पुरावा सादर करताना श्रीपाद छिंदम यांनी एक फोन रेकॉर्डिंगही पत्रकारांना ऐकवलं.

दरम्यान, छिंदम यांना मारहाम करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार’ असल्याचं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी म्हटलंय.