आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

मला सुशांतकडून एक बाळ हवं होतं- रिया चक्रवर्ती

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांत आत्महत्या प्रकरणी तिच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. रियाने एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती. आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की, आयुष्यभर एकमेकांना साथ देतील.

मला सुशांतकडून एक बाळ हवं होतं जे हुबेहुब त्याच्यासारखं दिसलं असतं. मी त्याला लिटील सुशी म्हणून हाक मारणार होते, असं रियाने सांगितलं आहे. आम्ही नेहमीच एका कपलसारखे बोलत होतो. आमची मैत्री प्रेमात कधी बदलली कळलंच नाही. मला चांगल्याप्रकारे आठवतं की आमची भेट कशी झाली होती. सर्वातआधी सुशांतनेच मला प्रपोज केलं होतं.

या मुलाखतीत सुशांतबद्दल अनेक माहिती रियाने उघड केली आहे. सध्या रियाची सीबीआय माहिती घेत आहे. तसेच त्याच्या रोजच्या संबधीत व्यक्तींची देखील चौकशी केली जात आहे. सुशांतचे पैस्यांचे व्यवहार कसे होते याची देखील माहिती घेतली जात आहे.