महाराष्ट्र राजकारण

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही- एकनाथ खडसे

Newslive मराठी-  मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

मला शनीची साडेसाती लागली आहे आणि शनी नेमका कोण आहे? हे पण मला माहिती आहे,  विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत अजून काही ठरवलं नाही, ज्या व्यक्तीने ४० वर्षे भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न केला. अस असताना त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्यात कोणतेही तथ्य नव्हते. असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, लोकसभेत भाजपला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येतील याकडे आमचे सध्या लक्ष आहे. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करेल. विधानसभा जवळ आल्यावर त्या लढवायच्या की नाही हा विचार त्यावेळी घेईन असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *