आंतरराष्ट्रीयखेळ

अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आयसीएसची बंदी

Newslive मराठी-  भारतीय क्रिकेट खेळाडू अंबाती रायुडूला गोलंदाजी करण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बंदी घातली आहे.

अंबाती रायडूच्या गोलंदाजीवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर नियमाप्रमाणे त्याने १४ दिवसांमध्ये आयसीसीसमोर गोलंदाजीची चाचणी देणे आवश्यक होते. मात्र चाचणी न  दिल्याने त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती. अंबातीच्या गोलंदाजीत त्याच्या चेंडू फेकण्याच्या पद्धतीवर आक्षेप नोंदवण्यात आला होता.