कोरोनामहाराष्ट्र

एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला की पालिकेला दीड लाख रुपये मिळतात?, जाणून घ्या सत्य..

देशात कोरोनचे रुग्ण वाढतच आहेत. लाखो कोरोनाबाधित रुग्ण रोज देशात आढळत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 31,67,324 वर गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 58,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रुपये मिळतात असा एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

कोरोना रुग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रुपये मिळत असल्यामुळे हा सगळा धंदा सुरू झाला आहे, अशी ऑडिओ क्लिप सध्या प्रसारित होत आहे. मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावे ही क्लिप फिरत असल्याने ती गांभीर्यानेही घेतली जात आहे; मात्र असा कोणताही निधी दिला जात नसून, हा क्लिपमधील संदेश खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कोरोना काळात अनेक अफवा देखील पसरवण्यात येत आहेत.