कोरोनामहाराष्ट्र

“रूग्णालयांनी जादा बील घेतल्यास शिवसेनेशी गाठ आहे”

Newslive मराठी- कोरोनाचे थैमान सर्व राज्यात वाढत आहे. आता रुग्णालयात बेड देखील उपलब्ध होत नाहीत. आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बिल आकारले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी सर्वसाधारण बेडसाठी चार हजार रुपये, आयसीयू बेडसाठी सात हजार 500, व्हेंटिलेटरसह आयसीयू बेडसाठी नऊ हजार इतके दर निश्चित केले आहेत. त्यापेक्षा अधिक शुल्क रुग्णालयांना आकारू नये. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दर निश्‍चित केले आहेत.

त्यापेक्षा जादा दर आकारले जात असल्याची तक्रारी आहेत. सर्वच रुग्णालयात असा प्रकार होतो असे नाही पण ज्या रुग्णालयात लूट होत असेल तर शिवसेना वठणीवर आणेल असा इशारा शिवसेनेने दिला.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जादा शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांना शिवसेना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज दिला.

रुग्णालयात प्रबोधन फलकामुळे गरिबांची लूट निश्‍चितपणे थांबेल, असा विश्‍वास जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केला. जाहीर फलक लावण्यास आजपासून सुरवात झाली. यासाठी हेल्पलाईन क्रमांक शिवसेनेने दिला असून त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.

दरम्यान, देवणे यांनी कोविड उपचारसाठीची रुग्णालये निश्‍चित आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार होतात त्याचाही जनतेने लाभ घ्यावा, प्रबोधन फलकांमुळे गरिबांची होणारी लूट निश्‍चितपणे थांबेल असे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केला नवा खुलासा

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका