महाराष्ट्रराजकारण

…तर पेट्रोलने शतक गाठल्याशिवाय राहिले नसते- धनंजय मुंडे

Newslive मराठी- लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या नसत्या तर विराटचे शतक झाले असते की माहित नाही परंतु पेट्रोलने शतक गाठल्याशिवाय राहिले नसते असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

पंतप्रधान चौकीदार असतानाही देशातील चोर करोडो रुपये लूट करुन गेले आहेत. त्यामुळे मोदी कृपेने तुमच्या- माझ्या डोक्यावर १५ लाखाचे कर्ज केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.

दरम्यान, सरकारी कोषात तत्वत:, सरसकट हे शब्द सापडले नाहीत परंतु हे संघाच्या पोतडीतून आले आहेत असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

…म्हणून विरोधक आतापासून इव्हीएम सवाल करत आहेत- मोदी