महाराष्ट्रराजकारण

पक्षाने जबाबदारी दिली तर बारामती पालिकाही जिंकून दाखवू- गिरीश महाजन

Newslive मराठी-  पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती पालिकाही जिंकून दाखवू असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला होता. ते जामनेर तालुक्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

याबाबत विचारले असता महाजन म्हणाले,आपण बारामती’त लढणार असे आपण बोललो नाही, मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणूक व चार महापालिका प्रमाणेच बारामती पालिका निवडणूकीची जबाबदारी पक्षाने आपल्याकडे दिली तर त्या ठिकाणीही नियोजन करून आपण विजय मिळवून दाखवू. आपण निवडणूकीचे नियोजन अत्यंत मायक्रो प्लॅनिंग असते त्यामुळेच हे यश मिळते.

दरम्यान, राज्यात युती झाल्यास दोन्ही पक्षाला फायदा होणार आहे. त्यामुळे युती आवश्यक आहे, भाजप वरीष्ठ नेतेही त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमची तयारीही आहे, आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात आहे. असंही महाजन यावेळी म्हणाले.