आरोग्यमहाराष्ट्र

लस नाही आली तर हिवाळ्यात गंभीर रूप धारण करेल ‘कोरोना’!

बघता बघता संपूर्ण जगभरात दाखल झालेला कोरोना ज्याने काही महिन्यातच संपूर्ण भारताला आपल्या विळख्यात घेतले. 8 महिन्यांत जगातील 213 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला. दोन कोटीहून अधिक लोक यामुळे आजारी पडले असून 8 लाखाहून अधिक लोकांचा बळी गेला. आता हिवाळ्याचा हंगाम फार दूर नाही, म्हणून जागतिक आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे साथीच्या रोगाची दुसरी लाट येऊ शकते, जी पहिल्यापेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते.

थंड हवामानात विषाणूचे वर्तन कसे होईल याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. सुरुवातीच्या अहवालावरून असे दिसते की, हिवाळ्यामध्ये हे अधिक काळ जिवंत राहू शकते. ‘द प्रिंट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार क्लोस स्टोहर या संसर्गजन्य रोग तज्ञाने यापूर्वी डब्ल्यूएचओ बरोबर काम केले आहे.

ते म्हणतात की, ‘या विषाणूचे वर्तन श्वसन-संबंधित इतर आजारांपेक्षा फार वेगळे असणार नाही. हिवाळ्यात. दरम्यान, ते परत येऊ शकते. यामुळे जस लवकरात लवकर बाजारात आली पाहिजे नाहीतर संसर्ग वाढतच जाणार आहे.