बातमीलक्षवेधी

नेहमीच तुमची मस्करी होत असेल तर या गोष्टी करा!

NEWSLIVE मराठी-  लोक नेहमीच तुमची मस्करी करत असतील, तुमची खिल्ली उडवत असतील, किंवा तुमच्यावरच काही जोक्स पास करत असतील तर आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. ज्यामुळे लोक तुमचा माजक करणे टाळतील.

बऱ्याचवेळा गप्पांची मैफिल रंगते आणि आपण त्यामध्ये शामिल झाल्यानंतर किंवा आपण आपले शब्द व्यक्त केल्यानंतर आपलेच मित्र किंवा आपल्या जवळचे लोक आपली खिल्ली उडवतात, आपला मजाक करतात. लोक तुमच्यावर जोक किंवा मजाक करणार नाहीत यासाठी पुढील गोष्टी करा.

  • हळू आवाजात बोलणे बंद करा.
  • प्रश्न किंवा मुद्दा समजून त्यावर बोलणे.
  • शक्य असल्यास चर्चेमध्ये सुरुवातीपासूनच सामील व्हा.
  •  दुसरा काय म्हणतो हे लक्षपूर्वक ऐका. समोरच्याचे बोलणे आपण समजू शकलो नाही तेव्हा समोरचा माणूस केलेल्या विधानावर मौन पाळा.
  •  एखाद्या विषयाचे संपूर्ण ज्ञान असले तरच आपण त्या विषयावर बोलले पाहिजे.
  • बोलतेवेळी अडखळणे, अशुद्ध भाषा वापरणे, बोलतेवेळी घाबरल्यासारखे करणे टाळले पाहिजे.