महाराष्ट्रराजकारण

मुंबई पोलिसांबद्दल काहीही बोललात तर…; मनसेनेचा कंगनाला इशारा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचाच धागा पकडत मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगना राणौतला इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असे खोपकर यांनी म्हटले आहे.

तसेच ‘आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ मुंबई पोलिसांमुळेच. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो, कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते मुंबई पोलीस, असे खोपकर यांनी ट्विट करत म्हंटले.

दरम्यान, ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असे म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असे कंगणा म्हणाली. आता हा वाढ वाढण्याची शक्यता आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.