बारामतीमहाराष्ट्र

बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी

Newslive मराठी-  (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) बारामती शहरातील भिगवण रोडवरील सराफ होंडा शोरुमच्या पाठीमागे आज 13 फेब्रुवारी रोजी (गुरुवारी) मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. विशेष म्हणजे ही वृक्षतोड नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

सदर वृक्षतोड ही नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे सुमारे 60 ते 70 लिंबाच्या झाडांची कत्तल पालिकेकडून करण्यात आली आहे. सदर वृक्षतोडी करताना बारामती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे शहराध्यक्ष अभिजीत कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते दयावान दामोदर यांनी रंगेहाथ पकडले.

याबाबत जाब विचारला असता संबंधिक अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देत तेथून पळ काढला. तसेच एका ट्रक्टरच्या सहाय्याने तोडलेली झाडे नेली.

या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करून शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, रिपाई (अ) शहर सचिव सम्राट गायकवाड आणि दयावान दमोदर यांनी बारामती नगर परिषदचे मुख्याधिकारी, बारामती तहसिलदार आणि बारामती प्रांताधिकारी यांना संबंधितांवर वनसंरक्षण अधिनियम कायदा 2018 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

एसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी!

नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक