महाराष्ट्रराजकारण

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा- रामदास आठवले

सध्या राज्यात कंगना रणावत वाद चांगलाच गाजत आहे. अभिनेत्री कंगणा राणावतच्या वादानंतर शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्यानं सर्वत्र वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करत असलेलं शिवसेनेचं सरकार सुडबुद्धीचं राजकारण करत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण गढूळ झाल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीला शिवसेनेने समर्थन दर्शवल आहे.

कंगणा राणावतलाही यांचा अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. शिवसेनेला विरोधी पक्ष भाजपनेही या प्रकरणावरून धारेवर धरलं आहे. राऊत यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा हे कधी नौदलात नव्हतेच असा दावा केला होता. मात्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मदन शर्मा यांच्या ओळखपत्राचा फोटो ट्विट करत राऊतांचा दावा खोटा ठरवला आहे. आठवले यांच्या या प्रतिक्रियेनंतर हा वाद आता अजून वाढण्याची शक्यता आहे.