खेळमहाराष्ट्र

काहीही झाले तरी माझा पाठींबा भारतालाच- सानिया मिर्झा

भारतीय टेनिसपटू सानियाने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचं नाव मोठं केलं. अनेक महत्वाच्या स्पर्धांची विजेतेपदं सानियाने पटकावली. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत विवाह झाल्यानंतर सानिया सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय बनलेली असते. २०१० साली सानिया आणि शोएब यांचं लग्न झालं. संकेतस्थळाशी बोलत असताना सानियाने आपल्या आणि शोएबच्या रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं.

आमचं नातं खूप निखळ आहे. आम्ही दोघेही खूप मजा करत असतो. अनेकांना वाटतं की मी खूप बोलत असेन पण मुळात असं काही नाहीये. शोएब माझ्यापेक्षा जास्त बोलत असतो. आम्ही आमचं प्रोफेशन कधीही नात्यात आणू देत नाही. आम्ही दोघेही खेळाडू आहोत, आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणं आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

लग्नापूर्वीच मी शोएबला सांगितले होते की माझा पाठींबा शेवटपर्यंत भारतालाच असणार आहे. आणि यामुळे आमच्यात कधीच अडचण येत नाही आम्ही खूप खुश आहोत असेही ती यावेळी म्हणाली.