महाराष्ट्रराजकारण

भंडारातील पूर बाधितांच्या बचावासाठी नाना पटोले मैदानात

यावर्षी पावसाचे प्रमाण वाढले आहे. भंडारा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पाण्याच्या पातळीत होत असलेली वाढ यामुळे विविध ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही पूर परिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो आहे. आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे लाखांदुर तालुक्यात दौऱ्यावर असुन त्यांनी लाखांदूर तालुक्यातील खैरना, मोहरना गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली

पटोले यांनी पूरबाधित लोकांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देऊन अन्य लोकांनाही तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. गेल्या काही दिवसापासुन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला.

शेतातील पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश पटोले यांनी दिले असुन पूर बाधित गावांना मदत व बचाव कार्याचा पटोले यांनी आज आढावा घेतला. तसेच लवकरात लवकर मदत देखील मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.